ठळक घडामोडी

कुडाळ उद्यमनगर येथे महामार्गावर अपघात!

दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी

कुडाळ : प्रतिनिधी
     मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर जवळ पादचारी महिलेला दुचाकीची धडक बसून अपघात झाला. यात सदर महिलेला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.
     मिळालेल्या माहितीनुसार, तेथील रम्बलर स्पीड ब्रेकर येथून महामार्ग ओलांडण्यासाठी सदर पादचारी महिला अचानक लेनवर आली असता, पिंगुळीहून कुडाळच्या दिशेने येणा-या दुचाकीची तिला धडक बसली. यात ती रस्त्यावर पडून गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

error: Content is protected !!