ठळक घडामोडी

हुमरमळा (वालावल) करमळीवाडी प्राथमिक शाळा दुरुस्ती कधी करणार?

पं. स. सदस्या सौ.अर्चना बंगे यांचा शिक्षण विभागाला सवाल

कुडाळ सभापतींची भेट घेऊन लक्ष वेधणार – सौ.बंगे

कुडाळ : प्रतिनिधी
      हुमरमळा (वालावल) मधील करमळीवाडी प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक बनल्याने कधीही कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पालक जीवमुठीत घेऊन आपल्या पाल्यांना या धोकादायक शाळेत पाठवत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे शिक्षण विभाग लक्ष देईल का? असा सवाल वालावल पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी विचारला आहे.
        हुमरमळा वालावल करमळी वाडीतील प्राथमिक शाळा इमारत धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत बसविणे धोक्याचे झाले आहे, असे सौ. बंगे यांनी सांगून याकडे थेट शिक्षण विभागाचे लक्ष वेधले आहे. शाळेची पहाणी करुन मुख्याध्यापक सौ. म्हापणकर व पालकांकडून वस्तुस्थितीची पहाणी त्यांनी केली.
       सभापती मिलिंद नाईक यांची भेट घेणार!
कुडाळ पंचायत समिती सभापती श्री. मिलींद नाईक यांची पालकांसमवेत भेट घेऊन या धोकादायक शाळेच्या दुरुस्ती साठी तातडीने निधीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सौ. बंगे यांनी दीली आहे.

error: Content is protected !!