ठळक घडामोडी

मालवणात सिंगल यूज प्लास्टिकविरोधात धडक कारवाई; ६,६०० रू.चा दंड वसूल!

मालवण नगरपरिषदेची विशेष तपासणी मोहीम

व्यापारी व नागरिकांना पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन

मालवण : महेश कदम
       मालवण नगरपरिषदेकडून शहरात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक (Single Use Plastic – SUP) विरोधात विशेष तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत एकूण ६,६०० रू.इतका दंड वसूल करण्यात आल्याची माहीती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
      विशेष मोहिमेत शहरातील भाजी मार्केट, फळ विक्रेते, किराणा दुकाने तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच व्यापारी व नागरिकांना पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
       ही मोहीम मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी संध्या गवळी व स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यामध्ये नगरपरिषदेचे मुकादम, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेत तपासणीबरोबरच जनजागृतीही केली.
मालवण शहर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने अशा विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले असून, सर्व नागरिक व व्यापाऱ्यांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!