ठळक घडामोडी

ओंकार तेली नेहमीच सामाजिक कार्यात पुढे – आ.निलेश राणे!

ओंकार तेली यांच्या माध्यमातून कुडाळमध्ये मोफत वैकुंठ रथ सेवा सुरू

आमदार निलेश राणेंच्या हस्ते लोकार्पण; हेल्पलाईन नंबर जाहीर

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळचे माजी नगराध्यक्ष व उद्योजक ओंकार तेली यांच्या पुढाकारातून त्यांचे वडील प्रसिद्ध व्यापारी कै. सुधीर राजाराम तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुडाळ शहरात मोफत वैकुंठ रथ सेवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या वैकुंठ रथ सेवेचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी सायंकाळी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पार पडला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी ओंकार तेली यांच्या सामाजिक कार्याचे जाहीर कौतुक केले.
     आ.निलेश राणे म्हणाले, ओंकार तेली यांनी कुडाळ शहरात सुरू केलेला वैकुंठ रथ सेवा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. ओंकार तेली जे उपक्रम राबवतात ते नेहमीच इतरांपेक्षा वेगळे आणि समाजाभिमुख असतात. त्याबद्दल त्याचे मी अभिनंदन करतो. विकासकामांच्या मोठ मोठ्या गोष्टी नेहमीच होत असतात, परंतु ज्याची खरोखरच गरज असते अशा लहान लहान गोष्टीही फार महत्त्वाच्या असतात. आणि हीच गोष्ट ओंकारने हाती घेतली आहे. ओंकारचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याने असेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, आपले त्याला निश्चितच सर्वतोपरी सहकार्य राहील असे सांगून त्यांच्या कार्याचे आ.राणेंनी भरभरून कौतुक केले.
        ओंकार तेली म्हणाले, वडीलांच्या स्मरणार्थ हा वैकुंठ रथ सेवा उपक्रमाचा लोकार्पण सोहळा होत आहे. वैकुंठ रथ ही संकल्पना कुडाळ शहरात प्रथमच आली आहे. एखाद्या घरात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर, ते शव स्मशानभूमी पर्यंत नेण्यासाठी अनेकदा वाहन मिळत नसते, अनेक अडचणी निर्माण होतात. अशा दुःखाच्या क्षणी आर्थिक ओझे कमी करून, त्या व्यक्तीचा अंतिम प्रवास सन्मानाने पार पाडता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात ही वैकुंठ रथ सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी 9420106270, 9890335487, 8275112885, 9423818539 व 9356363939 हे पाच मोबाईल हेल्पलाईन नंबर देण्यात येत असून, त्यावर संपर्क साधण्यात आल्यानंतर ही सेवा उपलब्ध होईल. यापूर्वीही आपण शहरात वातानुकुलित शवपेटी मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर हा मोफत वैकुंठ रथ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
        यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, श्रीमती सुवर्णा तेली, माजी जि.प.अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, अस्मिता बांदेकर, प्रसाद रेगे, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, दयानंद चौधरी, संतोष कदम, नगरसेवक अभी गावडे, निलेश परब, विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, रेवती राणे, निलेश तेंडुलकर, संजय भोगटे, रोहित भोगटे, आबा धडाम, सीए.सागर तेली, दत्ता कुडाळकर, नितीश म्हाडेश्वर, मंदार चंद्रकांत शिरसाट, चेतन पडते, मयुर शिरसाट, बंड्या शिरसाट, जितेंद्र सावंत, दादा पडते, चंदन कांबळी, राकेश कांदे, डाॅ.धनंजय राऊळ, अवधूत शिरसाट, श्रीराम शिरसाट, ऋषिकेश शिरसाट, ऋजेश शिरसाट, अक्षय सावंत, प्रकाश कोरगावकर, भूषण मठकर, प्रथमेश पडते, ओंकार साळवी, राजेश मांजरेकर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार व नागरिक उपस्थित होते. भाजप कुडाळ मंडल तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, मोहन सावंत, राजू गवंडे, सचिन काळप, सुनिल बांदेकर यांनीही या उपक्रमाला उपस्थिती लावली.

error: Content is protected !!