ठळक घडामोडी

कुडाळ सभापती मिलिंद नाईक–संजय पडते यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून चेंदवणला नुकसानीची पाहणी!

शिवसेनेकडून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत सुपूर्द

मुसळधार पावसात घरांवर झाडे पडून झाले होते नुकसान

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथे मुसळधार पावसामुळे योगेश मेस्त्री, विजय मेस्त्री, गिरीजा मेस्त्री तसेच अनिल चेंदवणकर यांच्या घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चेंदवण येथे भेट देत नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. तसेच आपद्ग्रस्त कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांना धीर देत शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.
     यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय पडते आणि कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात दिला. या प्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा माजी सरपंच देवेंद्र नाईक, रश्मी नाईक, अरविंद करलकर, सुशिल कदम, शाखाप्रमुख तुषार नाईक, गटप्रमुख दादा ठुंबरे, स्वप्नील चेंदवणकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भूपेश चेंदवणकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!