दहावीतील गुणवंतांसह शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश
कुडाळ : प्रतिनिधी बॅरिस्टर नाथ पै विद्यालय, कुडाळ येथे मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी शैक्षणिक वर्ष सन २०२५–२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी शेवाळे, माजी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल आवाजात ईशस्तवन व स्वागत गीत गावून चैत्तन्यमय वातावरण निर्मिती केली. मुख्याध्यापक प्रेमदास राठोड यांनी पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु. यश प्रमोद परब, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या कु. रिया मंगेश धुरी आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या कु. विनीत नित्यानंद परब यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याशिवाय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्राप्त विद्यार्थी कु.कृतिका केरकर, खुशी खरात, गार्गी आजगावकर, आविष्कार कदम, मैत्रेय प्रभू, आयुष भोई तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्राप्त कु.हंसिका वजराटकर, कु सर्वज्ञा गोठणकर, कु.ओराई पंडित या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.वक्तृत्व, रांगोळी आदी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, पालक आणि विद्यालयाला दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री. सुर्वे तर मान्यवराचे आभार पिंगुळकर यांनी मानले









