ठळक घडामोडी

कुडाळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी विकास बडवे; पदभार स्वीकारला!

डिवायएसपी राजेश भागवत व निरीक्षक विकास बडवे यांचे कुडाळमध्ये स्वागत

सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट व सहकाऱ्यांकडून दोन्ही अधिका-यांचे स्वागत

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ पोलीस ठाण्याच्या निरिक्षक पदी विकास बडवे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज बुधवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
     तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पदी राजेश भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ पोलीस ठाणे येथे श्री.भागवत व श्री.बडवे यांची कुडाळ सुधार समितीने भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट,
डॉ. मधुकर सवदत्ती, विवेक पंडीत, महेश ओटवणेकर, राजन माडये, प्रकाश कुंटे, द्वारकानाथ घुर्ये आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!