ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर उच्च लाटांचा इशारा!

नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
      INCOIS (Indian National Centre for Ocean Information Services) या संस्थेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टीदरम्यान दि. २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून ते दि. २९ जुलै २०२६ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत सुमारे ३.१ ते ३.२ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
      या कालावधीत समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमार, पर्यटक तसेच किनारपट्टीलगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!