ठळक घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त ओरोसच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम!

बाळगोपाळांची दिंडी, हरिपाठ व भजने; भाविकांना उपस्थितीचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
     नूतन सोसायटी ओरोस येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात शनिवार दि.२५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
     सकाळी ८ वाजता श्री विठ्ठल रखुमाईच्या मुर्तींची अभिषेक करुन विधिवत पुजा करण्यात येईल. सकाळी १० वांजता ओरोस येथील यूरोकिड्ज प्री स्कुल तसेच विद्यानिधी इंग्लिश मिडीयम शाळेच्या बाळगोपाळांच्या दिंडीचे आगमन होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता नूतन महिला मंडळातर्फे हरीपाठ होईल व  भजनाचा कार्यक्रम होईल. नंतर रात्री ८ वाजता महाआरती होईल. भाविकांनी उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

error: Content is protected !!