पं.स.सदस्य निखिल कांदळगावकर आणि डिगस शिवसेनेचा पुढाकार
कार्ड नोंदणीसाठी महिलांची गर्दी; ग्रामस्थांनी आयोजकांचे मानले आभार
कुडाळ : प्रतिनिधी
शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या प्रेरणेतून डिगस पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर आणि शिवसेना (शिंदे) डिगस यांच्या संयुक्त विद्यमाने डिगस येथे आयोजित NCMC (एसटी बस सवलत कार्ड) नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. निखिल कांदळगावकर यांच्या पुढाकारातून २०० रूपये किंमतीचे NCMC कार्ड ५० रू. सवलतीसह १५० रू.मध्ये उपलब्ध करून देण्यात आले. शिबिरात एकूण २५५ लाभार्थ्यांनी नोंदणी करून लाभ घेतला. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांनी शासनाच्या विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी अशा उपक्रमांना प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. गावातच शिबीर आयोजित करून नोंदणीचा लाभ दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आयोजकांचे आभार मानले.









