साड्यांवर मोठ्या ऑफर्स; हँडलूमसह अनेक आकर्षक वस्तू होलसेल दरात
खरेदीची सुवर्णसंधी! महासेलचा मंगळवार २८ जुलै शेवटचा दिवस
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला व पिंगुळी येथे सुरू असलेला विघ्नहर्ता महासेल ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गजबजून गेला आहे. कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील पिंगुळी म्हापसेकर तिठा नजीकच्या चामुंडेश्वरी मंगल कार्यालय, सिंधुदुर्ग पॅलेस येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या महासेलमध्ये कुडाळसह वेंगुर्ले आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी भेट देत आहेत.
कोल्हापूरचा विघ्नहर्ता महासेल खास सिंधुदुर्गवासीयांसाठी १८ जुलैपासून पिंगुळीत भरविण्यात आला आहे. येथे कंजीपुरम सिल्क, बनारसी सिल्क, कलांजली पैठणी, पैठणी सिल्क, कॉटन सिल्क, फॅन्सी साड्या तसेच हँडलूम, ब्लँकेट, पिलो आणि इतर अनेक आकर्षक वस्तू होलसेल दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. साड्यांवर विशेष ऑफर्स देण्यात आल्या असून काठपदर साड्या अवघ्या 149 रूपयांपासून उपलब्ध आहेत.
महिलांसह नागरिकांचा या महासेलला मोठा प्रतिसाद मिळत असून, कुडाळ, पिंगुळी दशक्रोशी, वेंगुर्ले तसेच इतर भागांतील ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येथे दाखल होत आहेत. दरम्यान, मंगळवार, २८ जुलै २०२६ हा महासेलचा अखेरचा दिवस असून, रात्री ९ वाजेपर्यंत खरेदीची संधी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन विघ्नहर्ता महासेल व्यवस्थापनाने केले आहे.









