सह्याद्रि ॲडव्हेंचर ॲड रेसंक्यु ग्रुप आंबोली – सांगेली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्गचे आयोजन
सामूहिक कामगिरीवरच आंबोली मॅरेथाॅन यशस्वी – गजानन कांदळगावकर व मायकेल डिसोजा
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
सह्याद्रि ॲडव्हेंचर ॲण्डरेस्क्यु ग्रुप आंबोली – सांगेली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांचे संयुक्त आयोजित भव्य आंबोली मान्सून मॅराॅथाॅनमध्ये 21 किमी पुरूषगटात सांगलीचा चैतन्य रूपनर प्रथम व महिला गटात ठाण्याची साक्षी पवार प्रथम,10 किमी पुरूषगटात सांगलीचा अनिकेत देशमुख प्रथम व महिलागटात पुण्याची यामिनी ठाकरे प्रथम आली. सिंधुदुर्ग ,रत्नागिरी,कोल्हापूर ,सांगली ,पुणे,मुंबईसह गोवा,कर्नाटक,मेंगलोर ,महाराष्ट्र येथून उत्स्फूर्त 700 धावपटूंचा सहभाग होता. प्लास्टिकमुक्त आंबोली ,प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्गचा सामाजिक संदेश – जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ मोहन दहिकर यांनी देत स्वतः 10 किमी मध्ये सहभाग घेतला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ.मोहन दहिकर,भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ,विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब ,सौ वेदिका परब ,साई जळवी ,सह्याद्रि ॲडव्हेंचर व रेस्क्यू ग्रुपचे अध्यक्ष बाबल अल्मेडा ,उपाध्यक्ष उत्तम नार्वेकर ,पं.स सदस्य मायकेल डिसुजा ,सचिव संदेश गोसावी,सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग अध्यक्ष गजानन कांदळगावकर ,कुडाळ सायकल क्लबचे रूपेश तेली व शिवप्रसाद राणे ,सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती श्री पंकज दळवी,आंबोली सरपंच सावित्री पालयेकर, निवेदक सचिन मदने ,झुम्बा सदस्य कृतिका कोरगावकर व प्रदिप्ती कोटकर ,उमेश गाळवणकर,डाॅ जी टी राणे ,पेमेंद्र पोरे ,प्रमोद भोगटे,डाॅ सिध्दार्थ परब ,अभिजीत परब ,डाॅ राजवर्धन देसाई ,रोटरी क्लब ऑफ कुडाळचे सचिव राकेश म्हाडदळकर,राजीव पवार ,अजिंक्य जामसंडेकर,ॲड सुप्रिया राणे ,ॲड सुहास सावंत,ॲड निलांगिणी रांगणेकर- सावंत,दिनेश गावडे आदि उपस्थित होते.
सविस्तर निकाल
21 किमी खुलागट पुरूष प्रथम चैतन्य रूपनर (सांगली)व द्वितीय अभिषेक देवकाते (कोल्हापूर),21 किमी खुलागट महिला प्रथम साक्षी पवार (ठाणे) व द्वितीय ममता पाटील (सांगली),21 किमी 35 ते 45 वयोगट पुरूष प्रथम मल्लापा पुजारी (बेळगावी) व द्वितीय नंदेश गावकर (गोवा),21 किमी 45 ते 60 वयोगट पुरूष प्रथम सुनिल शिवणे ,द्वितीय अनंत तनकर,21 किमी 60 वर्षावरील पुरूष प्रथम उदय महाजन व द्वितीय विश्वनाथ शेटये (गोवा) ,21 किमी 35 ते 45 वयोगट महिला प्रथम नेत्रा सुतार (कोल्हापूर)व द्वितीय चित्रा सापळे (कणकवली),21 किमी 45 ते 60 वयोगट महिला प्रथम पल्लवी मूग ,द्वितीय कविता जाधव (सिंधुदुर्ग), 10 किमी खुलागट पुरूष प्रथम अनिकेत देशमुख (सांगली),द्वितीय संकेत पाटील (कोल्हापूर), 10 किमी खुलागट महिला प्रथम यामिनी ठाकरे (पुणे),द्वितीय दिक्षा जाधव (सिंधुदुर्ग),10 किमी 35 ते 45 वयोगट पुरूष प्रथम शंकर मगदूम व द्वितीय जगदिश शिंदे ,10 किमी 45 ते 60 वयोगट पुरूष प्रथम इराप्पा नाईक ,द्वितीय पवनकुमार अराल्लीगीदाद,10 किमी 60 वर्षावरील पुरूष प्रथम सतिश गावंडळकर व द्वितीय सुरेंद्र,10 किमी 45 ते 60 वयोगट महिला प्रथम द्राक्षायनी मुरगुड,द्वितीय माधुरी शिवदे,10 किमी 35 ते 45 वयोगट महीला प्रथम शांती देसाई (कुडाळ),द्वितीय प्रिती मनीष (मेंगलोर),10 किमी 60 वर्षावरील महिला प्रथम डाॅ अमृता वेजरे (देवगड),द्वितीय मालन कंटक आदींनी यश संपादित केले.
मॅराॅथाॅनचे सहप्रायोजक
भव्य आंबोली मान्सून मॅराॅथाॅन पर्व 3 रे यशस्वी करण्यासाठी सहप्रायोजक म्हणून के एस आर ॲक्वॅरियम केसरी,दिपकभाई केसरकर मित्रमंडळ,विशाल सेवा फाऊंडेशन ,संजू परब मित्रमंडळ सावंतवाडी,राणे हाॅस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ,डार्क फाॅरेस्ट रिसाॅर्ट आंबोली,हाॅटेल विसलिंग वूड आंबोली ,हाॅटेल दुर्वांकुर आंबोली, मानतेश सावंत बिसलरी डिस्ट्रिब्युटर्स,दयानंद परब ,सावंतवाडी पॅलेस,सिंधुदुर्ग जिल्हा बॅक आदींचा मोलाचा सहभाग लाभला.
ब्रॅण्ड ॲबेसिटरचा विशेष सन्मान
ब्रॅण्ड ॲम्बेसीटर अर्चना पांचाळ,विराज गाड,पल्लवी मूग,योगेश सातव,जयंत शिवदे,डाॅ स्वप्निल दाभोलकर,यशवंत परब,डाॅ शंतनू तेंडुलकर,डाॅ स्नेहल गोवेकर,डाॅ रोहन कोरगावकर आदींचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सायकलिस्ट असोसिएशनचे गजानन कांदळगावकर,रूपेश तेली,शिवप्रसाद राणे ,निवेदक सचिन मदने,उमेश गाळवणकर, आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.
मान्यवरांचे सन्मान
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ मोहन दहिकर,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,विशाल सेवा फाऊंडेशनचे विशाल परब ,रेन्बो रायडर्सचे डाॅ बापू परब,आंबोली सरपंच सावित्री पालयेकर आदिंचे विशेष सन्मान करण्यात आले.
68 मॅराथाॅन धावलेला 10 वर्षाचा कबीर हेरेकरचा सन्मान
सावंतवाडीचा 10 वर्षांचा कबीर हेरेकर याने महाराष्ट्र ,गोवा येथील विविध 68 मॅराथाॅनमध्ये सहभागी होत धावल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
आंबोली सैनिक स्कूलचे एन सी सी कॅडेट्स ,बॅ नाथ पै फिजिओथेरपी टीम कुडाळ ,आंबोली – सावंतवाडी पोलिस अल्फा रेसींग टीम पुणे,ब्रेकींग कोकोनट टिम फोटोग्राफी पुणे आदींचे अनमोल योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
दमदार पावसाची व दाट धुक्यामुळे मॅराथाॅनचा उत्साह वाढला
पहाटेपासूनच आंबोली येथे दमदार पाऊस व दाट धुक्यामुळे आंबोली मान्सून मॅराथाॅनचा उत्साह जबरदस्त वाढलेला होता.लहान चिमुकल्यांचाही उत्फूर्त सहभाग पहायला मिळाला.
जागतिक मैत्री दिनानिमित्त अनेक मैत्री ग्रुप सहभागी!
जागतिक मैत्रीदिनाचे औचित्य साधत कुडाळ येथील जीवलग क्लासमेट मैत्री ग्रुप,सखेसोबती मैत्री ग्रुप पिंगुळी कुडाळ या माध्यमातून धावपटूंनी उत्फूर्त सहभाग दर्शवला.
भविष्यात आंतरराष्ट्रिय धावपटू सहभागाबाबत प्रयत्न करणार – विशाल परब
विशेष उपस्थिती दर्शवलेले विशाल सेवा फाऊंडेशनचे विशाल परब यांनी भविष्यात आंबोली मान्सून मॅराथाॅनमध्ये आंतरराष्ट्रिय दर्जाचे धावपटू सहभागी होण्याबाबत विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वस्त केले.
सामूहिक कामगिरीवरच आंबोली मॅराथाॅन यशस्वी – गजानन कांदळगावकर व मायकेल डिसोजा
जगप्रसिध्द पर्यटन स्थळ असलेले आंबोलीमध्ये येणा-या पर्यटकांमध्ये उत्तम आरोग्य व प्लास्टिकमुक्त आंबोलीचा संदेश देण्यासाठी सामूहिक टिमच्या कामगिरीमुळेच आंबोली मॅराॅथाॅन सलग तिस-या वर्षी यशस्वी झाल्याचे प्रतिपादन सह्याद्रि ॲडव्हेंचर चे मायकेल डिसोझा व सायकलिस्ट असोसिएशनचे गजानन कांदळगावकर यांनी केले.









