ठळक घडामोडी

कुडाळ श्री स्वामी समर्थ मठात उद्या गुरुपौर्णिमा उत्सव!

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

भक्तीगीतांसह किर्तन ते महाआरती

कुडाळ : प्रतिनिधी
       सालाबादप्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ, औदुंबरनगर, कुडाळ (कुडाळ–मालवण रोड) येथे उद्या बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
       सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत झाराप येथील बुवा संदेश सामंत यांचा सुश्राव्य भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत ह.भ.प. प्रशांत धोंड बुवा यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. रात्री ८.०० वाजता महाआरती होणार आहे. तसेच सकाळी ९.०० ते रात्री ८.०० या वेळेत सर्व भाविकांसाठी तीर्थप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या गुरुपौर्णिमा उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!