ठळक घडामोडी

घावनळे येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव; विविध धार्मिक कार्यक्रम!

गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी भाविकांसाठी पर्वणी

पादुका दर्शन, भजन, पालखी सोहळा, महाप्रसाद व दशावतार नाट्यप्रयोग

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ तालुक्यातील घावनळे-कासमळा येथील श्री स्वामी समर्थ मठात उद्या बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त दिवसभर धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगद्गमाता परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
      उत्सवाची सुरुवात बुधवारी पहाटे ५ वाजता काकड आरतीने होईल. सकाळी ६ ते ८ या वेळेत श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ पादुकांवर अभिषेक, पादुका पूजन व दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ९ वाजता पारायण, ११.३० वाजता महानेवेद्य व महाआरती, तर दुपारी १२ वाजता गुरुमाऊली व गुरुवर्य दादांचे पाद्यपूजन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता दत्तप्रसाद भजन मंडळ (धवडकी) यांचे भजन, सायंकाळी ४ वाजता नामस्मरण, सायंकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा पालखी सोहळा, रात्री ८ वाजता महाप्रसाद आणि रात्री ८.३० वाजता संयुक्त दशावतार महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
     तसेच दिवसभर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्म पादुकांचे दर्शन सुरू राहणार असून, सर्व स्वामी भक्तांनी या गुरुपौर्णिमा उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ घावनळेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!