ठळक घडामोडी

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा!

वाढदिवस सामाजिक बांधिलकीने साजरा; महाआरोग्य शिबिर, महाप्रसादासह विविध उपक्रम

सर्वपक्षीयांसह, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, आणि नागरिकांतून सभापती मिलिंद नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांचा वाढदिवस आज (गुरुवारी) तुळसुली, कुडाळ आणि अंबडपालसह विविध ठिकाणी विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वारंगाची तुळसुली येथील त्यांच्या गावी तसेच पंचायत समितीच्या सभापती दालनात त्यांच्या हस्ते केक कापून अभिष्टचिंतन सोहळा झाला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व मित्रपरिवाराने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनीही दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
     यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, जि.प. उपाध्यक्ष दादा साईल, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, अरविंद करलकर, दिनेश साळगावकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, जि.प.सदस्य दीपलक्ष्मी पडते, आरती पाटील व सुप्रिया वालावलकर, पं.स. सदस्य निखिल कांदळगावकर, बाळा कांदळकर, नितीन म्हाडेश्वर, मंगेश प्रभू, दिव्यानी खरात, अर्चना बंगे, अश्विनी सावंत, प्रियांका जळवी, राजन परब, नागेश आईर, अरविंद परब, केशव (आबा) मुंज, अनिकेत तेंडोलकर, प्रसाद गावडे, दिनेश वारंग, मकरंद नाईक, महेंद्र नाईक, प्रकाश मोर्ये, कानू शेळके, आनंद भोगले, अभय परब, मोहन सावंत, नागेश परब, सुनिल बांदेकर, पूनम पवार, मनोज पाताडे, सचिन काळप, योगेश घाडी, देवेंद्र सामंत, नागेश नेमळेकर, सिद्धेश परब, वैभव पवार, दत्ता कोरगावकर, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
     मिलिंद नाईक मित्रमंडळाच्या वतीने तुळसुलीसह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तुळसुली येथील अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना सभापती मिलिंद नाईक यांनी २६ वर्षांच्या राजकीय प्रवासातील आठवणींना उजाळा देत, “तुळसुली गावाने मला घडवले. ग्रामस्थांनी वेळोवेळी दिलेल्या विश्वासामुळेच सभापतीपदापर्यंत पोहोचलो असून, त्यांच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत राहीन,” असे सांगितले.
     वाढदिवसानिमित्त तुळसुली येथील लिंगेश्वर विद्यालयात रोटरी क्लब कुडाळ यांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. संजय केसरे, सरपंच जयराम वारंग, रोटरी क्लब अध्यक्ष मकरंद नाईक, डॉ. जयश्री केसरे, डॉ. अनिकेत वज्राटकर, डॉ. मोनालिसा वज्राटकर, डॉ. जॉर्जिना, डॉ. दत्तात्रय देसाई, डॉ. चिन्मय प्रभू, विकास लुडबे, वसंत नाईक, विलास वारंग, मिताली नाईक, सुरज कदम, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पडवे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी डॉक्टर, ग्रामस्थ व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मकरंद नाईक यांनी, तर सूत्रसंचालन अनिल वारंग यांनी केले.
     याशिवाय अंबडपाल येथील देवाचा डोंगर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दिवसभर तुळसुली, अंबडपाल, पावशी, देवाचा डोंगर आणि पंचायत समिती येथे विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती सदस्य, अधिकारी-कर्मचारी व नागरिकांनी भेट देऊन सभापती मिलिंद नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विविध सामाजिक उपक्रमांमुळे हा वाढदिवस सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला.

error: Content is protected !!