पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांचा सा.बां.विभागाला इशारा
नेरूर–कवठी, वालावल–हुमरमळा मार्गावरील झाडीमुळे अपघातांचा धोका
कुडाळ : प्रतिनिधी
वालावल पंचायत समिती मतदार संघातील मुख्य रस्ता दुतर्फा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात झाडी वाढडलेली असुन वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. येत्या चार दिवसात ही झाडी हटविण्याची कार्यवाही न झाल्यास कुडाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात ठिय्या मांडणार असा इशारा वालावल पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी दिला आहे.
वालावल पंचायत समिती मतदार संघात नेरुर ते कवठी, वालावल ते हुमरमळा या दोन्ही रस्त्यांवर रस्ता लगत झाडी मोठ्या प्रमाणात आली असुन अपघाताचे प्रमाण वाढले असुन वारंवार मागणी करुन दुर्लक्ष केला जातो, म्हणून येत्या चार दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ यांनी झाडी तोडुन घेण्यासंदर्भात कार्यवाही झाली नसल्यास या रस्त्यावरची झाडी तोडून टेम्पो भरुन कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आणून ठिय्या मारुन प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल असा इशारा सौ. बंगे यांनी दिला आहे.









