ठळक घडामोडी

सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी राजेंद्र मगदूम; पदभार स्वीकारला!

कुडाळनंतर आता सावंतवाडी पोलिस निरीक्षक पदाची राजेंद्र मगदूम यांच्याकडे धुरा

सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी राजेंद्र मगदूम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी सोमवारी (३ ऑगस्ट रोजी) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी बदली झालेले पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.
    राजेंद्र मगदूम यांनी यापूर्वी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांशी आपुलकीचे संबंध निर्माण करत प्रभावी कामगिरी बजावली होती. त्यांच्या नियुक्तीमुळे सावंतवाडी तालुक्यातील पोलीस प्रशासन अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
     यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजेंद्र मगदूम आणि अमोल चव्हाण यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, माधुरी मुळीक, प्रमोद पाटील, अमित राऊळ, मनोज राऊत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!