कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील नेरूरपार येथील शिवसेना कार्यकर्ते प्रणिल नाईक यांच्या मातोश्री शारदा गजानन नाईक (वय ६८) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आज, सोमवारी कुडाळ पंचायत समितीचे सभापती श्री. मिलिंद नाईक यांनी नेरूरपार येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रणिल नाईक व त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. या प्रसंगी विभागप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.









