मोदी सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग
कुडाळ : प्रतिनिधी
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला समर्थन दर्शविण्यासाठी कुडाळ येथे आज सकाळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या समर्थनार्थ विविध घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, बंड्या सावंत, पप्या तवटे, नगरसेवक निलेश परब, श्रेया गवंडे, अजय आकेरकर, सुप्रिया वालावलकर, सुनिल बांदेकर, मंगेश प्रभू, तन्मय वालावलकर, जयेश चिंचळकर, मोहन सावंत, निलेश तेंडुलकर, ममता धुरी, शिल्पा घुर्ये, नितीन म्हाडेश्वर, मुक्ती परब, ज्योती जळवी, यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.









