ठळक घडामोडी

नेरूर दुर्गवाड शाळेला कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची अचानक भेट!

कामकाजाची केली सखोल पाहणी; विद्यार्थ्यांशीही साधला संवाद

शाळेच्या रजिस्टरपासून पोषण आहारापर्यंत सभापती मिलिंद नाईक यांची प्रत्यक्ष तपासणी

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी आज मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) नेरूर दुर्गवाड येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट देत शाळेच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
     सभापती मिलिंद नाईक यांनी शाळेतील हालचाल रजिस्टरसह विविध अभिलेखांची तपासणी करून शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची प्रत्यक्ष चव घेऊन त्याच्या गुणवत्तेचीही खात्री केली. शाळेतील सुविधा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित विविध बाबींची त्यांनी पाहणी करत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी शिक्षिका श्रीमती कुडाळकर मॅडम, श्रीमती भोई मॅडम, ग्रामस्थ बशीर मुजावर, अनिश शाह, सरील खान तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!