महसूल दिनी श्रीराम प्रभूराळकर यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान
धाकोरे ग्रा.पं.सदस्य प्रविण पालव यांच्यासह ग्रामस्थांकडून पोलीस पाटीलांचा अभिनंदनपर सत्कार
धाकोरे : प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावचे पोलीस पाटील श्रीराम प्रभूराळकर यांचा महसूल दिनानिमित्त आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात आला. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. या गौरवानंतर धाकोरे ग्रामपंचायतीचे सदस्य प्रविण पालव यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने श्री.प्रभूराळकर यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. केशरचे झाड देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रविण पालव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष महादेव कापडी, अर्जुन पालव, बाबली कापडी, सुंदर गावडे, कुष्णा गोवेकर, प्रकाश परब, लक्ष्मण परब, दत्तात्रय गावडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.









