ठळक घडामोडी

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची घोडगे केंद्र शाळेला अचानक भेट!

विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद; शैक्षणिक कामकाजाची केली पाहणी

घोडगेनंतर सोनवडे क्रमांक १ शाळेलाही दिली भेट; शाळा प्रशासनाला दिल्या आवश्यक सूचना

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी आज शनिवारी सकाळी घोडगे केंद्र शाळेला अचानक (Surprise) भेट देत शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली. सकाळी ८.३० वाजता त्यांनी घोडगे येथे पोहोचून शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध उपक्रमांची माहिती घेतली.
     यावेळी सरपंच चैत्राली ढवळ, चेतन ढवळ, योगेश घाडी, दीपक खरात, प्रितेश गुरव, मोहन कोरगावकर, मुख्याध्यापक थापडे सर, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रशालेच्या वतीने सभापती मिलिंद नाईक यांचे स्वागत करण्यात आले.
      सभापती मिलिंद नाईक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियमित उपस्थिती आणि शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शाळेतील उपलब्ध सुविधा, स्वच्छता आणि शैक्षणिक वातावरणाची पाहणी करून आवश्यक बाबींवर संबंधितांना सूचना केल्या. यानंतर त्यांनी सोनवडे क्रमांक १ शाळेलाही भेट देऊन तेथील शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला.

error: Content is protected !!