ठळक घडामोडी

झाराप येथे एसटी-कार यांच्यात अपघात!

कारचालकाला दुखापत; एसटीही रस्त्यालगत कलंडली

कुडाळ : प्रतिनिधी
     आकेरी-हुमरसतिठा परिसरातील झाराप येथे आज सकाळी पावणे आठच्या सुमारास एसटी बसने समोरील चारचाकी कारला धडक दिल्याने अपघात झाला. कारला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत सखल भागात कलंडली. अपघातात कारचालकाला दुखापत झाली असून त्याच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने एसटीतील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच कुडाळ आगारप्रमुख रोहित नाईक, एसटी प्रशासन व कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातात एसटी बस व कारचे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!