कुडाळ सभापती मिलिंद नाईकांसह शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईकांची घटनास्थळी धाव
सभापतींकडून संरक्षण भिंतीचे आश्वासन
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील चेंदवण मळेवाडी येथील रस्त्या लगत असलेल्या शेत विहिरीचा भाग पावसाने कोसळल्याची घटना काल घडली. त्यामुळे तेथील रस्त्याने जाणा-या ग्रामस्थ व शाळेय मुलांसाठी धोका निर्माण झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच आज कुडाळचे सभापती मिलिंद नाईक आणि शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी माजी उपसरपंच रश्मी देवेंद्र नाईक, ग्रा. प. सदस्य सायली नाईक, शाखाप्रमुख तुषार नाईक उपस्थित होते.
यावेळी तेथे संरक्षणभिंत बांधून देण्याचे आश्वासन सभापती मिलिंद नाईक यांनी दिले.यावेळी स्थानिक ग्रामस्थ तात्या पोयरेकर, गोविंद भरडकर ,सागर पोयरेकर, संदीप टुंबरे,संतोष राऊत, रमेश म्हाकले, शंकर म्हाकले, केशव
पिळणकर,अनंत पाटील, नितीन पोयरेकर, नारायण तोरस्कर,काशीनाथ तोंडवळकर, सुशिल तोंडवळकर, तुकाराम तोंडवळकर, संजय राऊत आदी उपास्थित होते.









