ठळक घडामोडी

बेळणे खुर्दमध्ये जनावरांच्या पुल्पी किडनी रोगावरील लसीकरण व जनजागृती!

रावे कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांचा पशुसंवर्धनासाठी पुढाकार

वेळेवर लसीकरणाने जनावरांचे आरोग्य सुदृढ; डॉ. तुळशीराम वजीर यांचे मार्गदर्शन

कणकवली : प्रतिनिधी
     कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील अंतिम वर्षातील कृषी विद्यार्थ्यांनी रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत बेळणे खुर्द गावात जनावरांच्या आरोग्य संवर्धनासाठी पुल्पी किडनी (Pulpy Kidney Disease) रोग प्रतिबंधक लसीकरण प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रम आयोजित केला.
     या कार्यक्रमात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तुळशीराम वजीर यांच्या हस्ते जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी त्यांनी पुल्पी किडनी रोगाची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच वेळेवर लसीकरणाचे महत्त्व याबाबत पशुपालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. नियमित लसीकरणामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते, रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमात साहिल भोईटे, करण पाटील, रोहन पवार, विठ्ठलराज जगताप, प्रतिक सावंत, शिवम पुजारी, दुर्वांक घोडके, सुयश डोंगरकर, प्रथमेश शिंदे आणि अविनाश परिहार या कृषी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
      हा उपक्रम विषय शिक्षक प्रा. मोटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाटचे प्राचार्य डॉ. पंकज संते सर यांच्या प्रेरणेने तसेच रावे कार्यक्रम समन्वयक प्रा. वेदांत जोशी सर यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.

error: Content is protected !!