

वैभववाडी : प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यातील करूळ येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम हे मंगळवारी (दि. २८ जुलै) सकाळी नदीत वाहून गेल्याची घटना घडली. तालुक्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत असून, नदीला आलेल्या पुरात ते वाहून गेले.
स्थानिक शोध व बचाव पथकाकडून तातडीने शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर दुपारी सुमारे ४.२० वाजण्याच्या दरम्यान शोधमोहीमेदरम्यान श्री. कदम यांचा मृतदेह स्थानिक शोध व बचाव पथकाला आढळून आला. तहसीलदार, वैभववाडी यांनी ही माहिती दिली असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहीती प्रशासनाकडून देण्यात आली.









