ठळक घडामोडी

कुडाळमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी उत्साहात!

बॅ. नाथ पै विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी लक्षवेधी

वारकरी संस्कृतीचे विद्यार्थ्यांना संस्कार

कुडाळ : प्रतिनिधी
     आषाढी एकादशीचे औचित्य साधून बॅ. नाथ पै विद्यालय, कुडाळ यांच्या वतीने नुकतीच विद्यार्थ्यांची पारंपरिक दिंडी मोठ्या भक्तिभावात काढण्यात आली. दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी, संत तसेच भगवान विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टाळ, मृदंग आणि अभंगांच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम” चा जयघोष करत दिंडी शहरातून मार्गस्थ झाली.
       दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे कुडाळेश्वर मंदिरासमोर पार पडलेले पारंपरिक रिंगण होय. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायातील परंपरा जपत भक्तिमय वातावरण निर्माण केले. नागरिकांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करून विद्यार्थ्यांवर कौतुकाची वृष्टी केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संस्कृती, भक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्य यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रेमदास राठोड सर,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

error: Content is protected !!