
श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या सखोल चौकशीची मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान पेटीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज कुडाळ येथील गांधीचौकात जोरदार रघुपती राघव आंदोलन छेडण्यात आले. यावेळी टाळ वाजवत आणि रघुपती राघव राजाराम या भजनाच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनातून या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली.
या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नाडिस, विद्याप्रसाद बांदेकर, युवक काँग्रेसचे मंदार चंद्रकांत शिरसाट, उल्हास शिरसाट, सोनल सावंत, सुभाष सावंत, सुंदर सावंत, मनोहर धुरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.









