ठळक घडामोडी

हुंबरट येथे पुल्पी किडनी रोग प्रतिबंधक लसीकरण प्रात्यक्षिक!

रावे कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांचा जनजागृती उपक्रम

पशुपालकांना रोगप्रतिबंधक उपायांबाबत मार्गदर्शन

कणकवली : प्रतिनिधी
        कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील अंतिम वर्षातील कृषी विद्यार्थ्यांनी रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत हुंबरट गावात जनावरांच्या आरोग्य संवर्धनासाठी पुल्पी किडनी (Pulpy Kidney Disease) रोग प्रतिबंधक लसीकरण प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता.
     या कार्यक्रमात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तुळशीराम वजीर यांच्या हस्ते जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी त्यांनी पुल्पी किडनी रोगाची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच वेळेवर लसीकरणाचे महत्त्व याबाबत पशुपालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. नियमित लसीकरणामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते, रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
    या उपक्रमात संकेत दुपडे, माणकोजी लोंढे, विजय तांबे, धुळा करे, प्रतिक कुंभार, सुयश प्रभुखानोलकर, शिवा कादरी, मधु कुमार आणि दयाकर रेड्डी या कृषी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.हा उपक्रम विषय शिक्षक प्रा. मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली, कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाटचे प्राचार्य डॉ. पंकज संते यांच्या प्रेरणेने तसेच रावे कार्यक्रम समन्वयक प्रा. वेदांत जोशी यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.

error: Content is protected !!