RAWE कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बोर्डो पेस्ट तयार करण्याचे प्रशिक्षण
फोंडाघाट कृषी महाविद्यालयाचा उपक्रम; बुरशी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कणकवली : प्रतिनिधी
ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषिदूतांकडून ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत बेळणे खुर्द येथे बोर्डो पेस्टचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
बोर्डो पेस्ट हे एक बुरशीनाशक असून ते अनेक पिकांवर, विशेषतः भाजीपाला व फळबागांवरील रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाय आहे. विद्यार्थ्यांनी १ किलो चुना पावडर, १ किलो मोरचूद आणि १० लिटर पाणी वापरून बोर्डो पेस्ट तयार केली. ही पेस्ट झाडांच्या बुरशीग्रस्त भागावर वापरली जाते.
विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाचे महत्त्व, बोर्डो पेस्ट तयार करण्याची पद्धत तसेच वापरताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
या प्रात्यक्षिकासाठी कृषिदूत करण पाटील, साहिल भोईटे, रोहन पवार, प्रतिक सावंत, विठ्ठलराज जगताप, शिवम पुजारी, सुयश डोंगरकर आणि अविनाश परिहार यांनी परिश्रम घेतले. या प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे प्रा. संते सर, कार्यक्रम समन्वयक श्री. जोशी सर यांनी मार्गदर्शन केले.









