ठाकरे युवासेनेने राबवली स्वाक्षरी मोहीम; मंदार शिरसाट-योगेश धुरींचा पुढाकार
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; सोनम वांगचुक-अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला पाठींबा
कुडाळ : प्रतिनिधी
नीट (NEET) परीक्षेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करा, केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा या मागणींसह मॅग्नेस पुरस्कार विजेते सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट व पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या माध्यमातून ठाकरे युवासेनेच्या वतीने आज एक स्वाक्षरी विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम कुडाळ हायस्कूल समोर राबवण्यात आली, त्याला विद्यार्थी,पालक व शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नीट, जेईई, टीईटी परीक्षेच्या पेपर फुटी मुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. तरी यास जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधातील आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी सदर सह्यांची मोहीम राबवण्यात आली.येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसाठी युवासेना नेहमी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही मंदार शिरसाट व योगेश धुरी यांनी दिली
या आंदोलनात ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)चे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, ममता राऊळ, तसेच शिवाजी घोगळे, साबा पाटकर, कुणाल किनळेकर, नासिर शेख, अशोक कांदे, बाळा पावसकर, विजय प्रभू, संदीप म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, संतोष शिरसाट, बाळ कनयाळकर, दिलीप चव्हाण, गणेश वाईरकर, जगन्नाथ गावडे, सागर जाधव, प्रथमेश धुरी, यतिन माजगावकर, संतोष गावडे, दिनार चव्हाण, सुशांत परब, अनिकेत गावडे, सागर मयेकर, अविनाश अणावकर, विजय लाड, परेश गावकर, अनुवास नाईक, सुभाष नाईक, शंकर नाईक, रोहन शिरसाट,विनय पालकर, प्रथमेश राणे,अमित राणे पदाधिकारी ,कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक व. नागरिक उपस्थित होते.









