
राजू गवंडे-श्रेया गवंडे यांचा पुढाकार
श्री साई कला क्रीडा मंडळाचे आयोजन
कुडाळ : शहरातील श्री साई कला क्रीडा मंडळ, नाबरवाडी यांच्या वतीने नाबरवाडी येथे रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय मर्यादित नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिद्द, ताकद आणि कोकणातील पारंपरिक खेळाचा संगम असलेल्या या स्पर्धेला स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक श्री. शेखर (राजू) पुंडलिक गवंडे यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक सौ. श्रेया शेखर गवंडे, भाजपा नगरसेविका, कुडाळ नगरपंचायत, यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी मंडळाच्या वतीने विविध नियम व अटी लागू राहणार आहेत. स्पर्धेसाठी लागणारे नारळ मंडळाकडून देण्यात येणार असून, मंडळाकडून देण्यात आलेला नारळ खराब निघाल्यास तो बदलून दिला जाणार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या १०० स्पर्धकांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक स्पर्धकांनी अंतिम मुदतीपूर्वी नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ असून, स्पर्धेसाठी प्रवेश फी ४०० रुपये ठेवण्यात आली आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी तन्मय कुणाकावळेकर (८७६७३४९४१२), समीर गवंडे (९४२२८२९७२६) आणि बबली गवंडे (८७६७४३६३९३) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
‘जिद्द, ताकद आणि परंपरेचा संग्राम’ अशी ओळख असलेल्या नारळ लढविणे या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नारळ लढविण्याच्या शौकिनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परंपरेचा मान राखावा, असे आवाहन श्री साई कला क्रीडा मंडळ, नाबरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.








