ठळक घडामोडी

पिंगुळी-पाट मार्गावर अपघात; दुचाकीस्वार गंभीर!

कुडाळ : पिंगुळी-पाट मार्गावरील माड्याचीवाडी-करमळगाळू येथे ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून अचानक एसटी बस आल्याने दुचाकीस्वाराने दुचाकी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात ट्रकला धडक दिली. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
     पिंगुळीहून पाटच्या दिशेने ट्रक जात असताना त्यामागून रिक्षा व दुचाकी येत होती. रिक्षाने ट्रकला ओव्हरटेक केल्यानंतर दुचाकीस्वारानेही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून एसटी बस आल्याने दुचाकीस्वाराने डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकी ट्रकच्या मागील बाजूस आदळली. एसटी चालकाने प्रसंगावधान राखत बस तातडीने थांबविली. जखमी दुचाकीस्वाराला कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कुडाळ व निवती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली होती. एसटी आगार प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली.

error: Content is protected !!