ठळक घडामोडी

हुमरमळा-वालावल येथे नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या!

कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा-वालावल येथील गाळवणवाडी येथे आज रविवारी सकाळी एका पंधरा वर्षीय नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
     कु. युगा उमेश कानडे (वय १५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती पाट हायस्कूलमध्ये नववी इयत्तेत शिक्षण घेत होती. मात्र तिने आपले जीवन संपविण्याचा कठोर निर्णय का घेतला? याचे कारण समजू शकले नाही. याबाबतची खबर शंकर रामा कानडे (३९,रा.गाळवणवाडी-हुमरमळा) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर निवती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास निवती पोलीस करीत आहेत, अशी माहीती पोलिसांकडून देण्यात आली.

error: Content is protected !!