१,२१६ विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण
कुडाळ : भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आ. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील ९ जिल्हा परिषद शाळांमधील १२१६ विद्यार्थ्यांना नुकत्याच वह्यांचे वाटप करण्यात आले.
कुडाळ कविलकाटे, शाळा नंबर एक, कन्याशाळा, बाबाचाॅद उर्दू शाळा, कुंभारवाडा, पांडुरंग शेठ पडते पडतेवाडी शाळा, एमआयडीसी शाळा, मज्जिद मोहल्ला उर्दू शाळा आणि सांगिर्डेवाडी शाळा या शाळांमध्ये वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, जिल्हा उपाध्यक्ष बंड्या सावंत, ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर, तालुका चिटणीस राजू गवंडे, महिला जिल्हा सरचिटणीस आदिती सावंत, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, शहराध्यक्ष सुनील बांदेकर, नगरसेवक निलेश परब, उदय मांजरेकर, नगरसेविका सौ.अक्षता खटावकर, सौ.ज्योती जळवी,सौ.श्रेया गवंडे, सौ. आफरीन करोल, महिला शहर उपाध्यक्षा सौ. विशाखा कुलकर्णी, सौ.तेजस्विनी वैद्य, माजी नगरसेवक सचिन काळप, राजू बक्षी, राजेश पडते. आदी उपस्थित होते. पांडुरंग शेठ पडते पडतेवाडी शाळेत पहिलीतील विद्यार्थी विहान कुणाल तेंडुलकर यांनी उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत केले तसेच सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करून आ. रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले









