वेताळ बांबर्डेतील घटना; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
कुडाळ : महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या वीजवाहिनीचा (केबल) विद्युत प्रवाह गाभण गाईस लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वेताळ बांबर्डे तिठा-देवमळा (शेतमळा) येथे आज संध्याकाळी ६.३० च्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, पावशी सीमावाडी येथे राहणाऱ्या रिझवान उस्मान शेख यांची ७ वर्षांची गाभण गाईस देवमळा येथील शेतात चरत असता तिला ट्रान्सफॉर्मरच्या वीजवाहिनीचा विद्युत प्रवाह (शॉक) लागून तिचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये शेतकरी रिझवान उस्मान शेख यांचे अंदाजे ४५ ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर महावितरणच्या निष्काळजीपणा कारभारावर स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. गाभण गाईचा असा मृत्यू झाल्याने शेतकरी रिझवान यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.









