
स्वखर्चातून खड्डे बुजवत गांधीगिरी आंदोलन
मालवण : महेश कदम
मालवण नगरपालिका शहर हद्दीतील रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्याच्या समस्या वरून आज मालवण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक बनली दिवसभरात शहरातील अनेक धोकादायक खड्डे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी स्वखर्चातुन बुजवत ” गांधी स्टाईल, आंदोलनाची भूमिका घेतली मालवण नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावर दुर्लक्ष करत असेल तर यापुढे जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गॅरी ॲननसिएशन यांनी दिला.
यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ तालुका अध्यक्ष जगन्नाथ गावडे, वाहतूक सेनेचे विजय जांभळे, विशाल ओटवनेकर, शाखा अध्यक्ष महेश गावडे, शिवप्रसाद जोशी, प्रसाद मेस्त्री, हरी खवणेकर, संजोग गांगनाईक, निमेश चेंदवणकर, अमोल परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तर सत्ताधारी नगरसेवकांनी राजीनामा द्यावा
सध्या भ्रष्टाचार युक्त मालवण नगरपरिषद झाली आहे ती भ्रष्टाचार मुक्त मालवण नगर परिषद करा. मालवण नगरपरिषद सदरील रस्ता बांधकाम विभागाचा आहे म्हणून हात वर करते परंतु कॉम्प्लेक्सला परमिशन देताना मात्र बिनधास्त देतात खड्डे बुजविताना मात्र बांधकाम विभागाचा रस्ता सांगत आहेत.परंतु कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी मंजुरी देताना 500 मीटरच्या अंतरामध्ये सर्व बांधकाम विभागाचे निकष धाब्यावर बसवून सोयीस्कररित्या परवानगी दिली जाते. यामध्ये अर्थकारण काय? त्यावेळी निकष कसे बदलले जातात. आता या 500 मीटर च्या अंतरावर जे खड्डे पडले आहेत ते जीवघेणे असून शेकडो पालक व विद्यार्थी जीव मुठीत धरून जीव घेणा प्रवास करत आहेत. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे अपघात होऊन गंभीर अशी दुखापत झाली आहे. नगरपालिका एखाद्याचा जीव जाईल आणि मग जागी होईल का? असे झाल्यास जबाबदार कोण.नगरपालिका हाकेवर असलेले खड्डे.जर नगरपालिकेला दिसत नसतील तर सत्ताधारी नगरसेवकांनी राजीनामा द्यावा.असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गॅरी ॲननसिएशन यांनी दिला.










