ठळक घडामोडी

संस्कृतभारती तर्फे कुडाळ येथे संस्कृत विज्ञान प्रदर्शन आणि १० दिवसीय संस्कृत संभाषण शिबिराचे उद्घाटन!

कुडाळ : संस्कृतभारती तर्फे संस्कृत सप्ताह निमित्त सुशिला शिशुवाटिका, हिंदू कॉलनी, कुडाळ येथे २५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वप्रथम दुपारी १२ वाजता संस्कृत विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृतभारतीचे जनपद सह मंत्री व सावंतवाडी संस्कृत वेद पाठ शाळेचे अध्यक्ष श्री. राजाराम चिपळूणकर, श्री. वळंजू, सिंधुदुर्ग विद्याभारती उपाध्यक्ष श्री. श्रीधर गोरे, आयोजक प्राध्यापक स्नेहा शशांक पिंगुळकर, सुशिला शिशुवाटिकेच्या योगिता कवठणकर दीदी आणि स्थानिक संस्कृतप्रेमी उपस्थित होते.
     यानंतर दररोज संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत चालणाऱ्या १० दिवसीय संस्कृत संभाषण शिबिराची सुरुवात झाली. हे संस्कृत संभाषण वर्ग पूर्णतः निशुल्क आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग विद्याभारती कार्यकारणी सदस्य श्री. उमेश नाडकर्णी महोदय उपस्थित होते. सदर शिबिरातील वर्ग सौ. अवनी अवसरे महोदया यांनी अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने घेऊन शिबिराची सुरुवात केली. स्थानिक नागरिकांनी या निशुल्क उपक्रमाचा लाभ घ्यावा व “आपली मातृभाषा संस्कृत” ही पुन्हा बोलीभाषा करण्यात सहभागी व्हा! असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.

error: Content is protected !!