
रावे कार्यक्रमांतर्गत कृषीकन्यांचा उपक्रम
कुडाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या RAWE कार्यक्रमांतर्गत हुमरमळा (अणाव) गावातील शेतकऱ्यांच्या परसबागेत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सुपारी, लिंबू, नारळ, आंबा आदी विविध उपयुक्त झाडांची लागवड करण्यात आली. या उपक्रमामागील उद्देश गावामध्ये पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्र वाढविणे आणि वृक्षलागवडीबाबत जनजागृती करणे हा होता. तसेच लागवड केलेल्या झाडांचे योग्य संगोपन, पाणी व्यवस्थापन व निगा राखण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात RAWE विद्यार्थिनी हर्षदा साबळे, आकांक्षा जाधव, संजीवनी पाटील आणि श्रावणी बाचल यांनी सक्रिय सहभाग घेतला. शेतकऱ्यांचे सहकार्य लाभल्यामुळे हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.










