
कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक आणि मान्यवरांची शिबिराला भेट
कुडाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल (रेल्वे स्टेशन रोड) येथे सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने आज घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ७६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
प्रसिद्ध उद्योजक अब्बास आदम खुल्ली यांच्या हस्ते फीत कापून रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी रक्तदात्यांचे कौतुक केले. या रक्तदान शिबिराला शिवसेना (शिंदे) शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी भेट देऊन रक्तदाते, आयोजक व फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे अभिनंदन करून फाउंडेशनच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
नवीन रक्तदाते घडविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न
सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन गेल्या सहा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. नवीन रक्तदाते तयार करणे, नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करणे, या उद्देशाने फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
कोरोना महामारीच्या कठीण काळातही मिल्लत फाउंडेशनने मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करून गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला. याशिवाय गरजूंसाठी पेशंट बेड, व्हीलचेअर व अन्य आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याचे कार्यही फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून “रक्तदान हीच जीवनदानाची सेवा” या भावनेतून फाउंडेशन कार्यरत आहे. रक्तदानाच्या माध्यमातून एखाद्या गरजू रुग्णाचे प्राण वाचविण्याची संधी मिळते. त्यामुळे युवकांसह सर्व नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराला न.पं.तील गटनेते तथा नगरसेवक विलास कुडाळकर, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अफ्रिन करोल, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेवक मंदार शिरसाट, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, एजाज नाईक, उद्योजक मुश्ताक शेख, हाफीज नाजिम, हाफिस शेख, मोबीन दोस्ती, शेखर गवंडे, इम्रान खान, विद्याधर कुडाळकर, अमित राणे, राजवीर पाटील आदी उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध उद्योजक अब्बास आदम खुल्ली यांनीही शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले.
सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान, गरजूंसाठी मदत आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांचा हा प्रवास भविष्यात आणखी व्यापक स्वरूपात सुरू राहावा, यासाठी उपस्थित मान्यवरांनी सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनला शुभेच्छा दिल्या.
रक्तदान करणारे रक्तदाते
शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांमध्ये पुढील नागरिकांचा समावेश होता : शहाजी सिराज पाटील, अब्बास अली सय्यद, सादतहुसेन अश्रफहुसेन नाईक, रेहान अरशद आवटे, अल्ताफ अब्दुल्ला काझी, अब्बास आदम खुल्ली, निसार हुसेनसाब मणीयार, बशीरुद्दीन उस्मान शेख, रफीक अलाबक्ष शेख, वजीर परवेज मुजावर, परवेज नाईक, शांताराम गावकर, इझान अताफ शेख, मोहम्मद रफीक हुसेनसाब मणीयार, नाझीर हुसेन अल्ताफ शेख, जफर अब्दुल रहमान जमादार, तोहित अल्ताफ शेख, मोहसिन खुतबुद्दीन जद्दी, विक्रम जाधव, सादिक कादर मेमन, जावेद लियाकत खुल्ली, वसीम सादिक सय्यद, इसाक अन्वर मुजावर, जहेज गौस शेख, अनिकेत महेश तेंडुलकर, सुकृत नागेश कराळकर, गोविंद रामचंद्र कोरगावकर, शब्बीर कादर मेमन, सुलताना सादतहुसेन नाईक, अफरीन अब्बास करोल, जमीर मुनीर पटेल, अरशद आसिफ दोस्ती, प्रसाद सावंत, नाझिम इकबाल मुकादम, जतीयाज शमशुद्दीन करोल, अम्मार अजीम शेख, फरहान उमर खान, अल्ताफ इसाक मणियार, इस्माईल सादिक बागवान, मुबीन सलीम दोस्ती, राहील इब्राहिम शहा, इक्बाल इरफान दोस्ती, असगरअली सय्यद शहा, सोहेल इलियास शेख, संकेत संजय कुडाळकर.










