
नगरसेवक मंदार शिरसाट व कुडाळ शहर ठाकरे शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम
कुडाळ : प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाच्या रक्षणासाठी सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा सन्मान तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम नगरसेवक मंदार शिरसाट व कुडाळ शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज राबविण्यात आला. यावेळी माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्रत्येक माजी सैनिकाला सन्मानपूर्वक शाल व रोपटे देऊन गौरविण्यात आले.
देशासाठी आयुष्य वेचलेल्या माजी सैनिकांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी प्रवास साजरा करताना देशसेवकांचा सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष ठरला.
यावेळी बोलताना युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट म्हणाले, “माजी सैनिकांमुळे आपण आज स्वतंत्र हवेत श्वास घेत आहोत. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून हरित कुडाळ करण्याचा संकल्प केला आहे. त्यांचा सन्मान करणे हे आमचे परमभाग्य आहे.”
कार्यक्रमाला माजी सैनिक श्री. शंकर मेस्त्री, श्री. सिद्धार्थ पाटील, श्री. सायमंड रॉड्रिक्स, श्री. अनिल नाईक, श्री. लाडू शेडगे, श्री. नारायण गावडे, श्री. प्रवीण परब, श्री. भैय्या राऊळ, श्री. महेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. सिद्धार्थ पाटील यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रेया परब, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर, युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्निल शिंदे, शहरप्रमुख संतोष शिरसाठ, शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, उपशहरप्रमुख शैलेश काळप, गुरु गडकर, युवासेना शहर समन्वयक अमित राणे, विनय पालकर, श्री. परब, नाना कुडाळकर, श्री. शारबिद्रे, सुलभा देसाई आदी उपस्थित होते.










