
रस्त्यावर झाडाची फांदी आल्याने अपघात
वेंगुर्ला युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब यांच्यासह लोकप्रतिनिधी – ग्रामस्थांची धाव
सावंतवाडी : प्रतिनिधी
आजगाव-मळेवाड येथील राजगड रिसॉर्टजवळ आज रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अपघाताची घटना घडली. शिरोडा येथे भाजी विक्रीसाठी जात असलेल्या भाजी विक्रेत्याच्या वाहनासमोर अचानक झाडाची फांदी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी वाहनाने शिवसेना उपजिल्हाध्यक्ष सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या वाहनाला धडक दिली.
या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश उर्फ बड्या परब तसेच जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला.









