ठळक घडामोडी

कोकण विभाग कार डीलर्स असोसिएशनची स्थापना करण्यासाठी कुडाळमध्ये रविवारी (२३ ऑगस्ट) कार डीलर्सची महत्त्वपूर्ण बैठक!

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील डीलर्स एकवटणार; कार डीलर्सच्या प्रश्नांना मिळणार संघटित व्यासपीठ

कोकणातील कार डीलर्सची एकजूट; अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

कुडाळ : प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनच्या पुढाकाराने कोकण विभाग कार डीलर्स असोसिएशनची स्थापना करण्यात येत असून, त्यानिमित्त रविवारी (दि. २३ ऑगस्ट) कुडाळ येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
     या बैठकीस सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील कार डीलर्स मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सावंतवाडी, कणकवली, ओरोस, देवगड, कुडाळ, वेंगुर्ला, कसाल, कट्टा तसेच परिसरातील कार डीलर्स या बैठकीत सहभागी होणार आहेत. बैठकीदरम्यान कोकण विभाग कार डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात येणार आहे. कोकणातील कार डीलर्सना भेडसावणाऱ्या विविध समस्या व प्रश्नांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्यासाठी या माध्यमातून एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
      कार व्यवसायाशी संबंधित विविध प्रश्न, अडचणी आणि सामूहिक हिताच्या विषयांवर संघटितपणे काम करण्याच्या दृष्टीने या असोसिएशनची स्थापना महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीचे आयोजन उदयमनगर, कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर, हॉटेल आरएसएनच्या पाठीमागे करण्यात आले असून, कार्यक्रमाची वेळ सकाळी ११ वाजता आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कार डीलर्सनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!