
मुळदेतील निवासस्थानी जाऊन सभापती नाईकांनी केली प्रकृतीची चौकशी
कुडाळ : प्रतिनिधी
मुळदे येथील शिवसेनेचे कार्यकर्ते शरद पाताडे यांचा मुलगा राकेश पाताडे यांच्या प्रकृतीची कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात राकेशला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून, सभापती नाईक यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.
राकेश पाताडे यांचा २ फेब्रुवारी रोजी झाराप येथे मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर जवळपास एक महिना ते गोवा बांबोळी येथील रुग्णालयात कोमात होते. त्यांच्या डोक्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या कठीण काळात राकेश पाताडे आणि शरद पाताडे कुटुंबीयांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. मात्र, उपचारानंतर आता राकेश यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. सभापती मिलिंद नाईक यांनी आज मुळदे येथील पाताडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन राकेश यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली









