कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील हुमरमळा वालावल गाळवणवाडी येथील कु. युगा उमेश कानडे या १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कानडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी उमेश कानडे व कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना धीर देत सांत्वन केले. यावेळी युवासेना विभागप्रमुख मितेश वालावलकर उपस्थित होते.









