ठळक घडामोडी

गणेशोत्सवानिमित्त कुडाळमध्ये ‘नर्मदा आई’तर्फे विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सव!!

२९,३० व ३१ ऑगस्ट कालावधीत आयोजन; पूजा साहित्यापासून विविध वस्तूंची रेलचेल

संस्था अध्यक्षा सौ.संध्या प्रसाद तेरसे यांचा पुढाकार; नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
      गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नर्मदा आई महिला औद्योगिक सहकारी संस्था, कुडाळ यांच्या वतीने विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९, ३० आणि ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे हा महोत्सव होणार आहे, अशी माहीती संस्थेच्या अध्यक्षा सौ.संध्या प्रसाद तेरसे यांनी दिली.
     या प्रदर्शनात गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेले गणेश पूजन साहित्य, कापसाच्या वाती, धूप-अगरबत्ती, सजावटीचे साहित्य, रांगोळी, साड्या, रेडिमेड ब्लाऊज, ड्रेस, आर्टिफिशियल ज्वेलरी, सौंदर्यप्रसाधने, ग्राफिटी टी-शर्ट, लोकरची तोरणे, गणपतीचे दागिने आदी विविध वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच लहान मुलांचे कपडे, गोमय उत्पादने, गृहपयोगी वस्तू, कॉयर प्रॉडक्ट्स, मसाले, पीठ, फराळाचे पदार्थ, पापड, लोणचे, कोकणी पदार्थ यांसह विविध चविष्ट खाद्यपदार्थांचीही खरेदी करता येणार आहे. स्थानिक महिला उद्योजक व बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवासाठी आवश्यक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी या विशेष प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ. संध्या तेरसे यांनी केले आहे.
       स्थानिक उद्योजकांना एकत्रित करत त्यांना त्यांच्या उद्योग वाढीसाठी चालना देण्यासाठी तसेच स्थानिक ग्राहकांना उत्तम दर्जाच्या वस्तू योग्य दरात उपलब्ध करून देत स्थानिक उद्योजक विशेषत: महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे या सहकार्याच्या उद्देशाने गेली 7 वर्ष नर्मदाआई महिला औद्योगिक  सहकारी संस्थेच्या माध्यमातून आम्ही “खरेदी महोत्सव” आयोजित करत आहोत. vocalforlocal स्थानिकांना बाजारपेठ मिळवून देण्याचा संकल्प करत अविरत हे कार्य आमच्या नर्मदाआई संस्थेच्या वतीने सुरु आहे, असे सौ.संध्या तेरसे यांनी सांगितले.

error: Content is protected !!