ठळक घडामोडी

गावपातळीवर जनावरांसाठी लसीकरण मोहीम!

कृषीकन्यांचा पुढाकार; हुमरमळा गावात मार्गदर्शन

कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या RAWE कार्यक्रमांतर्गत हुमरमळा (अणाव) गावात “Organising Vaccination Campaign for Animals at Village Level” हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
     या उपक्रमांतर्गत पशुवैद्यकीय डॉ.एस. बी. सज्जन यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील जनावरांना FMD (Foot and Mouth Disease) लसीकरण करण्यात आले. यावेळी पशुपालकांना FMD लसीची माहिती देऊन जनावरांचे वेळेवर लसीकरण करण्याचे महत्त्व व रोगप्रतिबंधक उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
      हा उपक्रम RAWE विद्यार्थिनी हर्षदा साबळे, आकांक्षा जाधव, संजीवनी पाटील आणि श्रावणी बाचल यांनी आयोजित केला. या उपक्रमाचा उद्देश पशुपालकांमध्ये जनावरांच्या लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण करून पशुधनाचे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करणे हा होता. या उपक्रमाला गावातील पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

error: Content is protected !!