ठळक घडामोडी

कुडाळात नारळीपौर्णिमेनिमित्त ठाकरे शिवसेनेची रिक्षा रॅली!

जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यासह अमित सामंत सहभागी

भंगसाळ नदीपात्रात नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही नारळीपौर्णिमेच्या निमित्ताने आज सायंकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाने शहरात भव्य रिक्षा रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शहरातील मुख्य बाजारपेठेतून भंगसाळ नदीपर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रिक्षा व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या रॅलीमध्ये सजविलेल्या रिक्षांवर पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. तसेच घोषणाबाजी करीत पक्षाच्या समर्थनार्थ वातावरण निर्मिती करण्यात आली.
      ठाकरे शिवसेना शाखा येथून ठाकरे शिवसेना प्रणित रिक्षा संघटनेच्या रॅलीला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात शहरातून ही रॅली भंगसाळ नदीकाठी पोहोचली. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांच्या उपस्थितीत नदीपात्रात नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, शहरप्रमुख संतोष शिरसाट, जि.प. सदस्य गंगाराम सडवेलकर, बाळा पावसकर, अतुल बंगे, सत्यवान कांबळी, सतीश कुडाळकर, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, गुरू गडकर, दीपक सावंत, बाळू पालव, विनोद शिरसाट, अमित राणे, गोट्या चव्हाण, नितीन सावंत, शैलेश काळप,बंड्या कोरगावकर, सचिन ठाकूर, संतोष अडूळकर संदीप कोरगावकर,दाजी गावडे,निलेश मातोंडकर, हंसराज सावंत, रुपेश तुळसकर रिक्षा सेनेचे संजय मसुरकर, बाळा वेंगुर्लेकर,नागेश दळवी,दाजी गावडे,प्रवीण पालव,शामा परब आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते. दरम्यान, भंगसाळ नदीपात्रात नारळीपौर्णिमेचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनीही नदीपात्रात नारळ अर्पण करून उत्साहात नारळीपौर्णिमा साजरी केली.

error: Content is protected !!