ठळक घडामोडी

मालवण नगरपालिकेत कायमस्वरुपी मुख्याधिका-यांची नियुक्ती करा!

मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मालवण : महेश कदम
      मालवण नगरपालिकेवर सत्ता येऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप कायमस्वरूपी मुख्याधिकारी पद भरण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मालवण नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी न मिळणे ही मोठी शोकांतिका असून, नागरिकांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
     सध्या ज्या अधिकाऱ्यांकडे मालवण नगरपरिषदेचा पदभार सोपवण्यात आला आहे, ते अधिकारी आठवड्यातून अवघे २ दिवस उपलब्ध असतात. यामुळे नगरपालिकेशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना, व्यापाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक प्रशासकीय व विकासात्मक कामे खोळंबली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
    सत्ताधारी शासन शासकीय कार्यालयांमधील रिक्त पदे भरण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने सध्या पदभार सांभाळत असलेल्या अधिकाऱ्यांनाच कायमस्वरूपी पदभार सोपवण्यात यावा. अथवा मालवण नगरपरिषदेसाठी तात्काळ नवीन कायमस्वरूपी मुख्याधिकारी पदाची भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष गैरी अन्नरासिएशन, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!