ठळक घडामोडी

गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी कुडाळमध्ये ‘मांगल्य दालन’ ठरतेय आकर्षणाचे केंद्र!

अवघ्या ३ रुपयांपासून डेकोरेशन साहित्य; सिंधुदुर्गातील ग्राहकांची मांगल्य दालनात मोठी गर्दी

पडदे, झालर, झुंबर, फुले ते एलईडी माळा… गणेश सजावटीचे सर्व साहित्य एकाच छताखाली

कुडाळ : विशेष प्रतिनिधी
         गणेशोत्सव म्हटला की बाप्पाच्या आगमनासोबतच घर, मंडप आणि प्रतिष्ठापना स्थळाच्या आकर्षक सजावटीची लगबग सुरू होते. यंदाच्या गणेशोत्सवासाठी कुडाळ शहरातील ‘मांगल्य दालन’ ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून, गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या आकर्षक आणि विविध प्रकारच्या साहित्याने दालनात मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. कुडाळ शहरातील पोलीस स्टेशनसमोर सुरू करण्यात आलेल्या ‘मांगल्य दालना’त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी गणेशोत्सव डेकोरेशनचे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहे. अगदी ३ रुपयांपासून विविध प्रकारचे डेकोरेशन साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे अल्प बजेटमध्येही आकर्षक सजावट करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.
        सजावटीच्या साहित्याची आकर्षक विविधता
     कुडाळच्या मांगल्य दालनात गणेशोत्सवानिमित्त विविध प्रकारचे आकर्षक पडदे, छत कापड, झालर, लाईट झुंबर, आर्टिफिशियल फुले, हार, माळा, व्हिस्टेरिया, चना मॅट, गणपतीसाठी शेले, एलईडी झालर यासह सजावटीसाठी आवश्यक असणारे विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि आकर्षक डिझाईनमध्ये साहित्य उपलब्ध असल्याने ग्राहकांना आपल्या आवडीनुसार तसेच बजेटनुसार सजावटीचे साहित्य निवडण्याची सुविधा मिळत आहे. अवघ्या ३ रुपयांपासून सुरू होणाऱ्या दरामुळे छोट्या वस्तूंपासून मोठ्या सजावटीपर्यंत विविध पर्याय ग्राहकांना एकाच छताखाली मिळत आहेत. घरगुती गणपतीपासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या सजावटीपर्यंत विविध गरजा लक्षात घेऊन साहित्याची उपलब्धता करण्यात आली आहे.
       कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्हाभरातून ग्राहकांची पसंती!
       गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांतून नागरिक खरेदीसाठी मांगल्य दालनाला भेट देत आहेत. एकाच ठिकाणी सजावटीचे विविध पर्याय उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा वेळ आणि धावपळही कमी होत आहे. सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत मांगल्य दालन सुरू असल्याने नागरिकांना आपल्या सोयीच्या वेळेत खरेदी करता येत आहे. आकर्षक डिझाईन, विविध प्रकारचे साहित्य आणि होलसेल-रिटेल दर यामुळे मांगल्य दालन गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण ठरत आहे.
      ‘बाप्पाच्या स्वागताची सजावट’ एकाच छताखाली!
        गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असून, बाप्पाच्या स्वागतासाठी घराची तसेच गणेश मंडपाची सजावट करण्यासाठी नागरिकांची लगबग वाढली आहे. अशावेळी अवघ्या ३ रुपयांपासून विविध प्रकारचे डेकोरेशन साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने मांगल्य दालन ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात सजावटीच्या साहित्याने सजलेले मांगल्य दालन सध्या ग्राहकांच्या गर्दीने गजबजून गेले असून, ‘बाप्पाच्या स्वागतासाठी सजावट, मांगल्य दालनात मुबलक पर्याय’ असे चित्र कुडाळमध्ये पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!